ती?
Submitted by अनिवार on 29 August, 2025 - 04:46
ती?
शांत ऐस्या या दुपारी ती असावी अंबरा
तो नसेना चंद्र दारी ती असावी अंबरा!
हालचाली स्पष्ट होत्या शब्द अंधुकले जरा
ओठ माझे वाचणारी ती असावी अंबरा!
मोरपंखी रूप आले सावलीलाही तिच्या
श्रीहरीला मोहणारी ती असावी अंबरा...
येत आहे कोण आता पेन झाला कुंचला!
ह्या कवीची ओळ न्यारी ती असावी अंबरा
मेज दारातील सांगे हा असे वेडा कवी...
दौत माझी प्राणप्यारी ती असावी अंबरा
देवप्रिया /कालगंगा :- गालगागा गालगागा गालगागा गालगा
----------------------------------
विषय:
शब्दखुणा: