साव दरोडेखोर
Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 June, 2025 - 22:35
सुटले निर्दोष ते खुनी मुजोर थोर होते
गरीबांसाठीचे कायदे कमजोर होते
टोळी सफेदपोश राजरोस लुटून गेली
परवानाधारी साव दरोडेखोर होते
लपवीत आसवांना दैवाशी भांडतो मी
इरादे हृदयी पेरले बंडखोर होते
किती अश्राप प्रेते विव्हळती स्मशानी
झाले रक्तपिपासू युध्द घनघोर होते
भय जगाचे अजुनही कसे संपत नाही
कुणा देशातील काही युध्दखोर होते
© दत्तात्रय साळुंके
२९-६-२०२५
विषय: