दोष देऊ कसा

दोष देऊ कसा तुला आता

Submitted by बेफ़िकीर on 31 March, 2025 - 13:16

दोष देऊ कसा तुला आता
मीच कंटाळलो मला आता

लोक म्हणतात "बस जरा मित्रा"
मी म्हणत राहतो "चला आता"

चांगलाल्याच चांगला म्हणतो
एवढा कोण चांगला आता

आरसाही कधी म्हणत नाही
पाहिला मी कुणी भला आता

आपलासा न राहिला बहुधा
एक माणूस आपला ... आता

पावलोपावली सदा चिंता
मार्ग निघणार कोठला आता

ग्रूप त्याच्यामुळे जगत होता
होय, तो मित्र वारला आता

फक्त नसतो तसे दिसत बसणे
लोक जपतात ही कला आता

संपली 'बेफिकीर' मैफिल ही
श्वास दमला नि थांबला आता
=====

-'बेफिकीर'!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दोष देऊ कसा