इथे भुरटे चोर खूप आहेत.

इथे भुरटे चोर खूप आहेत..

Submitted by SharmilaR on 26 October, 2024 - 02:38

‘इथे भुरटे चोर खूप आहेत..’

अमेरिकेत अजू-कमू कडे पोहोचल्यावर दोन दिवसात आम्ही घरात सेट झालो, अन् मग नजर बाहेर वळली.

तसं पहिल्याच दिवशी मुलांनी घराभोवती फिरण्याची जागा दाखवून ठेवली होती. घर नं चुकता अगदी घराभोवतीच्या परिसरातच प्रदक्षिणा मारायची ठरवलं, तरिही छान एक किलोमीटरचा राऊंड होत होता तो. मग एक-दोन दिवस तसंच घराला प्रदक्षिणा मारत फिरलो.

घरात किचनमधलं तंत्र, म्हणजे इंडक्शन वापरणं.., डीश वॉशर लावणं..,हे जमायला लागलं. म्हणजे घाई कसलीच नव्हती, तरी मलाच तिथे पटकन स्वावलंबी व्हायचं होतं हे सगळं जमवून!

Subscribe to RSS - इथे भुरटे चोर खूप आहेत.