आल्या सया आखाड सरी Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 June, 2024 - 09:15 आल्या सया आखाड सरी त्यांचे रोमांच अंगभरी अशी भिजू भिजू निघाली पंढरीच्या वाटेवरी वारी ओल दिंड्या पताकात ओल दाटे काळजात अवघा रंगही एक येथ दीठी माऊली चराचरात मनोमनी एक धून मनोमनी एक छंद ठाई ठाई पांडुरंग ऐसा एकची अभंग © दत्तात्रय साळुंके विषय: काव्यलेखनशब्दखुणा: सया आखाड