सासर्यांचे धोतर
Submitted by ढंपस टंपू on 4 August, 2023 - 09:34
एका ओळखीच्या महिलेने मला सिरीयसली विचारले कि " फाटलेल्या धोतराचे काय करतात ?"
आमच्यात कुणीच धोतर नेसत नाहीत तरी तिने टाकलेल्या या गुगलीने गोंधळून जाऊन का, कशासाठी असे बेसिक प्रश्न विचारले.
त्यातून असे समजले कि तिच्या सासर्यांचे धोतर फाटलेले आहे. शिवून ते बरे दिसणार नाही म्हणून ती टाकून द्या असे म्हणाली.
तर ते उसळून म्हणाले कि " एव्हढं कापड आहे, थोडं फाटलं म्हणून फेकून द्यायचं असंच ? काही दिवस वापरू, नंतर पण त्याचा उपयोग होईल".
विषय:
शब्दखुणा: