जमाव आणि मी...
Submitted by aksharivalay 02 on 5 July, 2023 - 01:13
प्रसंग मानवतेला उद्विग्न
करणारा होता
आणि मनाच्या ठिकऱ्या
उडवणारा होता
स्वभावा प्रमाणे जमाव
जिज्ञासेने जमला होता
निर्विकार होता अन्
पाहण्यातच रमला होता
जमावाच्या डोईवर म्हणे
मानवतेची भिस्त होती
पुढे काही दिवस मानवता
प्रचंड अस्वस्थ होती
मी प्रत्यक्षदर्शी नव्हतो
तरीही उद्विग्न होतो
प्रश्न सळसळत होते
शोधात मग्न होतो
त्या क्षणी मी जर
त्या तिथं असतो तर?
बाभळी सारखा प्रश्न
काय असावं याच उत्तर?
विषय:
शब्दखुणा: