अंधाराधग

आंधारधग

Submitted by शब्दब्रम्ह on 13 June, 2023 - 01:13

हजारवेळा तुटून जुळावे
ही वेड्या हृदयाची जात आहे
दारिद्र्य दुःख अन् वेदनेची
त्यास आता साथ आहे
छिन्न विच्छिन्न काळजाला
रोज नवा आघात आहे
विश्वासाच्या अपराधाला
खिन्नतेची लाथ आहे
मनोक्षितिजाच्या हिंदोळ्यावर
उभी ठाकली रात आहे
बुजल्या आशेच्या दिव्याला
मिणमिणती थोटकी वात आहे
विराण सुन्न दाही दिशा
अन् निराशा भैरवी गात आहे
आभाळ पेलाणाऱ्या ताऱ्याला
आज अंधारधगीची मात आहे...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अंधाराधग