आयुष्याची बातच न्यारी.........

न्यारी बात

Submitted by मिरिंडा on 11 February, 2023 - 04:56

आयुष्याची बातच न्यारी
हारजीत कधी शरणागती
असलीच जरी ही रीत तयाची
उगाच धडपड जगण्याची

नाव डळमळे पाण्यावरती
तोल जातसे क्षणोक्षणी
अथांग सागर संसाराचा
अदृश्य किनारा पल्याडचा

वादळातले वारे खवळती
भ्रमिष्ट लाटा कवटाळीती
जवानीतला जोश साही
धडधड वाढे हृदयाची

जन्माचे जरी हजार रस्ते
मृत्यूचा तर एकच रस्ता
नाम तुझे घेवो न घेवो
आशेचे होती किरण पारखे

अरूण कोर्डे

Subscribe to RSS - आयुष्याची बातच न्यारी.........