खरच सांगतो
शीर्षक:- खरच सांगतो
तंत्रज्ञानच्या युगात
तिचा अन माझा
संवाद होत नाही
खरच सांगतो हल्ली भांडण होत नाही
कधी व्हॉट्सअप,कधी फेसबुक
तर कधी व्हिडीओ
कॉलवरच होतं बघणं
खरच सांगतो हल्ली भेटणं होत नाही
ती तिच्या मोबाईल मध्ये
मी माझ्या मोबाईल मध्ये
मुलांचं आता धडपडणं होत नाही
खरच सांगतो हल्ली खेळणं होत नाही
पाहुणे येतात,पाहुणे जातात
पण आमचे मोबाईल बंद करून
आदरातिथ्य होत नाही
खरच सांगतो हल्ली संस्कार होत नाही