थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिक प्रश्न
          Submitted by कुमार१ on 29 July, 2022 - 02:36        
      
    नुकताच घडलेला एक किस्सा.
 माझ्या मित्राने  त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला.  तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे.  त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती.  त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या.  त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".
विषय: 
शब्दखुणा: