पाऊस तुझा माझा
Submitted by अदिती ९५ on 16 July, 2022 - 22:35
पाऊस तुझा माझा
चिंब भिजलेल्या हिरव्या पानांचा
फांदीवर गोठलेल्या किलबिलाटाचा
पाऊस तुझा माझा
वाऱ्यावर लवणारी कोवळी पाती
अलवार स्पर्शणारी मऊ काळी माती
पाऊस तुझा माझा
श्रावणात बरसणारी संततधार
दूर रानी नाचणारा निळा मोर
पाऊस तुझा माझा
पगोळ्यांतून आपुली ओंजळ भरणारा
हवाहवासा मृद्गंध दरवळणारा
पाऊस तुझा माझा
आभाळातला सात रंगांचा आभास
मानेवर रेंगाळणारा नरम श्वास
पाऊस तुझा माझा
मिठीत विसावलेल्या हळुवार क्षणांचा
पाणावलेल्या कडांवर दाटलेल्या
आठवणींचा
विषय:
शब्दखुणा: