राजकाणापासून प्रेरित

रानबाजार वेबसिरिज

Submitted by अजिंक्यराव पाटील on 5 June, 2022 - 12:34

रान बाजार सिरीज बघतोय, शेवटचे 2 एपिसोड राहिलेत बहुधा, पण चर्चा करण्यासारखी सिरीज आहे. आधी चर्चा झाली ती प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतच्या बोल्ड सिनची. मला वाटतं उगाच ते टिझर टाकले. अजून तरी ते दोन्ही सीन आले नाहीयेत. कथा इतकी ग्रिपिंग आहे की एक एपिसोड जरी फुकट दाखवला तरी लोक पटा पटा प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन घेतील. महाराष्ट्रातल्या काही घटनांचे संबंध असू शकतात. पानसेने खूप खतरनाक उडी मारलीय!

Subscribe to RSS - राजकाणापासून प्रेरित