दुःख आले पाहुणा - -

दुःख आले पाहुणा - -

Submitted by जीजी on 17 March, 2022 - 06:05

दुःख आले पाहुणा - -

दुःख आले पाहुणा होवून दारी
अन घराचे जाहले मग कारभारी

रोज भेटू रोज बोलू एक होऊ
ती म्हणाली त्या तिथे तू ये दुपारी

घ्यायला मी दुःखही मग रोख घेतो
तू नको देऊ सुखाची मज उधारी

ती फुलांची बाग आता स्वैर झाली
एकही दिसते कळी ना लाजणारी

चालतो आहे सुखी दरवेश माझा
मज नको या काळजाची वाटमारी

जायचे आहे तुला क्षितिजा पलिकडे
सोड दुनिया मृगजळाची (अन) घे भरारी

जीजी

Subscribe to RSS - दुःख आले पाहुणा - -