आमच्या पूर्वजांना सग्गळं माहिती होतं का?
Submitted by भास्कराचार्य on 19 October, 2021 - 08:31
'गणितामध्ये भारतीयांचा वाटा नेहमीच सिंहाचा राहिला आहे' अश्यासारखी वाक्यं लहानपणापासून आपण ऐकत, वृत्तपत्रांमध्ये वाचत आलो आहोत. भारतीय लोक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यामुळे पुढे आहेत, ही बाब आपल्या मनावर ठसली आहे म्हणा ना! शून्याचा शोध आपल्याकडे लागला, हेही आपण रास्त अभिमानाने सांगतो. त्यातून पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांना सग्गळं सग्गळं ठाऊक असल्याचे व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स आपण नित्यनेमाने बघत असतोच. 'अमुक नावाच्या अक्षरांमध्ये ५ मिळवा, मग २ ने गुणा' इ. इ.
विषय:
शब्दखुणा: