मायबोली गणेशोत्सव २०२१ - टोचणी

शशक पूर्ण करा - टोचणी - बिपीन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 18 September, 2021 - 03:31

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
तो दरवाजा मनाचा ? ...
फिरंगोजी नरसाळा ! आपल्याला ते वडलांच्या जागी . चाकणच्या संग्रामदुर्गाचा किल्लेदार . वय झालेलं असताना शाहिस्तेखानाला त्या किल्ल्यासाठी दोन महिने झुंजवणारा शूरवीर .
त्यांनी संभाजीराजांना किल्ल्यात प्रवेश दिला ? … आपण त्यांना स्वराज्यातून बेदखल केल्यानंतरही ? याला एकच शिक्षा ! - तोफेच्या तोंडी . पहाटे .
अन पहाट झाली .

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२१  - टोचणी