तिच्या पापणीचा इशारा हवा

तिच्या पापणीचा इशारा हवा

Submitted by जीजी on 15 September, 2021 - 03:30

तिच्या पापणीचा इशारा हवा--

नभी हासरा सांजतारा हवा
तिच्या पापणीचा इशारा हवा

विसावे जरासे निजावे तिथे
कुशीचा तुझ्या मज किनारा हवा

मला तू हवी अन तुझे ओठ ही
फुलांचा जसा अर्क सारा हवा

पिऊनी मधूघट मधूरातचे
मला चांदवा झिंगणारा हवा

अशी घट्ट व्हावी मिठी रेशमी
गुलाबी गुलाबी शहारा हवा

नशा रातची ही जशीच्या तशी
सकाळी सकाळी उतारा हवा

जीजी

Subscribe to RSS - तिच्या पापणीचा  इशारा हवा