आठवणी माबोच्या

माझ्या आठवणीतली मायबोली- कुमार१

Submitted by कुमार१ on 10 September, 2021 - 22:00

सन २००५. माझे परदेशात अकुटुंब वास्तव्य. परदेशी जाण्यापूर्वी घाईघाईत मुलांकडूनच संगणक शिकलो होतो. तिकडच्या रुग्णालयात स्वतंत्र खोली व डेस्कटॉप मिळाला होता. त्याच्या जोडीला 24तास अनिर्बंध जालसेवा (ही त्यावेळी भारतात हेवा वाटण्यासारखी गोष्ट होती). सुरुवातीस कामातील संगणकीकृत गोष्टी शिकण्यात छान वेळ गेला. पण काही दिवसात त्यातले नाविन्य संपले. आठवड्यातील दोन दिवस सुट्टीचे. घरी एकटाच. मग तेव्हाही काही तास रुग्णालयातच पडीक राहायचो, अर्थात त्या जालसेवेसाठी. एकटेपणा खात होताच. त्यातून मराठीतून संवाद साधण्यासाठी तडफडत होतो. चिंतन करताना शालेय जीवनातल्या कविता आठवू लागलो.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आठवणी माबोच्या