दत्ताराम आता माझ्याकडे राहतो...........

दत्ताराम

Submitted by मिरिंडा on 26 March, 2021 - 05:13

दत्ताराम आता माझ्याकडे राहतो. आमचं चांगल जमतं. आम्ही दोघेही अविवाहित. तो माझ्याकडे येऊन पाचएक वर्ष झाली. तो चाळिशीच्या आसपास असेल‌. शिक्षण आठवी नापास. आमच्या गावाकडील नानासाहेब पुरोहितांचं एकमेव अपत्य. परमेश्वराला प्रसिद्ध लोकांच्या पोटी धोंडे जन्माला घालण्याचा छंदच असतो की काय , कोण जाणे. सध्या आपण दत्तारामला "दत्ता" म्हणू. आम्ही गावी राहायचो दत्ता नानांबरोबर आमच्या घरी यायचा‌ . शरीराने पहिल्यापासून बलिष्ठ. त्याच्यापुढे आम्ही म्हणजे अगदी पाप्याची पितरंच..

Subscribe to RSS - दत्ताराम आता माझ्याकडे राहतो...........