पाहिले होतेस तू मला तुटण्या आधी
Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 21:57
पाहिले होतेस तू मला तुटण्या आधी
दिलास होकार तू काही बोलण्या आधी
मला माहितीये नाही लायक तुझ्या मी
गुंतलो इतका प्रेमात काही कळण्या आधी
खूप दिवसाचे प्रेम आहे हे
सावरलेस तू मला डोळ्याचा बांध फुटण्या आधी
मिळाले होतेस उत्तर मला काळजात
भेडसावत असणाऱ्या प्रश्ना आधी
बरे झाले मिटली चिंता
कुणीतरी भेटले म्हणे मरण्या आधी
रचली होतीस चिता स्वतःच्या च हाताने
पण दिलास होकार तू मला जाळण्या आधी
कवी :- विनोद इखनकर
(शब्दप्रेम)
विषय:
शब्दखुणा: