पारिजात गझल कविता

पहिली कविता(गझल) मायबोलीवर

Submitted by प्रगल्भ on 28 June, 2020 - 03:00

तुझ्या भोवती सडा
जेव्हा फुलांचा असेल
त्यांत पारिजात एक
माझाही दिसेल

लहर वार्‍याची फुलाला
लेऊनी जात असेल
अल्लड पोरीपरी ती
तुला पळवेल

घ्यायला येशील गंध
लांबूनी गं त्याचा
न गंध त्यात, रंग
केशरी उरेल

-प्रगल्भ कुलकर्णी

Subscribe to RSS - पारिजात गझल कविता