लिही तू..
Submitted by पाचपाटील on 11 June, 2020 - 02:22
लिही तू..
एवढे सगळे जण लिहितायत.
आणि तू कशाला लाजतोयस येड्या?
पण तुझ्यापुरतं, तुला आत्ता जे खरं वाटतंय ते लिही.
किंवा तेच लिही.
आत्ता दुनियेबद्दल दाटून दाटून येणारे प्रेमाचे उमाळे जसे फोलकट आहेत तसेच नंतर कधीतरी स्वत:बद्दल चहूबाजूंनी चालून येणार्या घृणेच्या लाटाही बोगसच असतील, हे लक्षात घेऊन लिही.
सेक्सबद्दल डायरेक्ट नकोस लिहू.
आदिम भावनांचा शोध घेत असल्याचा आव आणत, आडून आडून, पण नेम धरून त्याच मुद्द्यावर घसरत जाण्याची एक नवीन पद्धत काढलीय आपल्या काही चॅप्टर लोकांनी...
तुझा पण तसलाच काही डाव आहे की काय...?
नाही ना..?
विषय:
शब्दखुणा: