भाकीत

आयुष्य आणि भाकरी

Submitted by मुक्ता.... on 21 February, 2020 - 22:41

आयुष्याचं करावं का भाकीत
जीव अडकलेला भाकरीत.....
पण सालं एकच हे आक्रीत....
आयुष्य मिळालं होतं मुदतीत...

शेवट आलेला होता जवळ
श्वासाशी कटणार होती नाळ
जिवाशिवात भुकेचा जाळ
एकच घास,घेऊन गेला काळ....

नको भाकीत ,नको भाकरी...
नको ती चढाओढीची चाकरी....
नको त्या धगधगत्या ऊर्जेचं स्तवन
अंतरात्मा करतो सत्यच स्तवन....

एकच काँक्रीट बनव देवा.....
माझाच मला वाटू दे हेवा

मुक्ता

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भाकीत