तरळांच्या कविता

॥तुजविण जीवन॥

Submitted by निर्मळाहरीसुत on 8 February, 2020 - 21:25

॥तुजविण जीवन॥

इथे कितीहि उलथा-पालथ होऊ दे।
तरीहि मी तुझ्यापाशीच आहे।।
जगं पालटवू दे त्यांना।
आम्हाला त्याचे काय आहे।।

इथे किती येतील नि किती जातील।
त्यांच्या नादाला कोण लागणार आहे।।
जसे जगायचे तसे जगु दे त्यांना।
आम्हाला कुणाचे काय भय आहे ?

इथे हे असेच घडणार आहे।
प्रलयाग्नी नक्कीच होणार आहे।।
झेलु दे त्यांना प्रहार ?
तेव्हाच त्यांना 'जीवना'चा अर्थ कळणार आहे।।

तुझी साथ असताना।
इथे मला काय कमी आहे ?
फक्त तुजविण जीवन "आई"।
तेव्हा सारे जगं व्यर्थ आहे।।

- नितीन तरळ

Subscribe to RSS - तरळांच्या कविता