विचारू नकोस ....

विचारू नकोस ....

Submitted by सोहनी सोहनी on 12 December, 2019 - 02:07

विचारू नकोस ....

तुझी आठवण रोजच येते, का येते विचारू नकोस
ती आली कि दिवसा सांभाळतो मी स्वतःला कसंतरी
रात्रीचं तू विचारू नकोस ...

एकांताचा निःशब्दतेत
तुझ्या अंतरातून उमटणारे शब्द माझे
ऐकून हि ऐकू नकोस,
डोळे आणि ओठ बंद तरी
हुंदक्यांचा तू विचारू नकोस ....

तू तोडलेल्या स्वप्नांचा हिशेब जमणार नाही, तू मांडूही नकोस
जिवंत आहेच ग मी
मेलेल्या मनाचं किमान तू तरी विचारू नकोस ....

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विचारू नकोस ....