कवी - प्रणव

पुणे तिथ काय उणे !

Submitted by Pranav_Kulkarni on 3 September, 2010 - 10:09

पुणे तिथ काय उणे …..

आहो आपण म्हणतो पुणे तिथ काय उणे …..
बरोबर आहे ........

इथ जागेंचे भाव झालेत १००० X कित्तिक पट गुणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

चौपाटी नसताना महाग झाले “Z Bridge” चे चणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

भर-रस्त्यात इथ खून मारामारी दंगा जाहीरपणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

इथ आईटी न वाढलय प्रमाण पार्टी, मग त्यात आले पिणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

जागेचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न,त्वरित कामपूर्ति साठी मग मलई खाणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे

मोकळी जागा विकायची म्हणाल की हजर पवार किंवा राणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कवी - प्रणव