आपलं नातं.
Submitted by तृष्णा on 2 September, 2010 - 08:41
एक पोकळी जी तुझ्या आणि माझ्यामध्ये आहे ती कधिही न भरण्यासारखी. पुर्वी आपण जे होतो आणि आज आपण जे आहोत त्यात किती फरक आहे ना. आज किती वेळ निघुन गेलाय आपल्यात हे कदाचित सांगणे कठीण आहे. पण नक्किच काहीतरी होत आपल्यात जे अजुनही मला तुझ्या जवळ जाण्यापासुन थांबउ शकत नाही. नक्किच काहीतरी होत ते. ते प्रेम कधिच नह्वत ओढ म्हण हवतर पण ते प्रेम नह्वत. कारण प्रेमात बंधन असतात पण आप्ल्या नात्यात कोणती बंधन नह्वती. कोणतीही गरज नह्वती होता तो फक्त सहवास तुझा आणि माझा प्रेमळ सहवास. एक निरागस नात असत ना ते होत आपल्यात.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा