आपलं नातं.

Submitted by तृष्णा on 2 September, 2010 - 08:41

एक पोकळी जी तुझ्या आणि माझ्यामध्ये आहे ती कधिही न भरण्यासारखी. पुर्वी आपण जे होतो आणि आज आपण जे आहोत त्यात किती फरक आहे ना. आज किती वेळ निघुन गेलाय आपल्यात हे कदाचित सांगणे कठीण आहे. पण नक्किच काहीतरी होत आपल्यात जे अजुनही मला तुझ्या जवळ जाण्यापासुन थांबउ शकत नाही. नक्किच काहीतरी होत ते. ते प्रेम कधिच नह्वत ओढ म्हण हवतर पण ते प्रेम नह्वत. कारण प्रेमात बंधन असतात पण आप्ल्या नात्यात कोणती बंधन नह्वती. कोणतीही गरज नह्वती होता तो फक्त सहवास तुझा आणि माझा प्रेमळ सहवास. एक निरागस नात असत ना ते होत आपल्यात. जस आकाशाच नात ढगांशी असत ना तस ढग आले काय आणि नाही आले काय आकाश आपली जागा सोडत नाही तो तसाच असतो निरंतर. चिरकाल.
ढागांनाच सवय असते वार्‍याच्या वेगाने उडायची वार्‍याला पर्वा असो ना असो पण ढग नेहमिच त्याच्या सोबत असतात. अगदी तसेच तु अजुनही चिरकाल तसाच आहे. मलाच नाद लागला आहे वार्‍याचा.
तु बदशील अशी मी फक्त अपेक्षाच करु शकते पण तु कधीच बद्दलणार नाहीस ह्याची खात्री आहे मला.

तु माझा होतास आणि मी तुझी कधीच होउ शकले नाही. मला तुझे होणे कधी जमलेच नाही. कशी होउ शकले असते मी तुझी? कारण प्रवाहाबाहेर वाहण्याची मला सवय नाही आहे. जे पुर्वी पासुन होत आलय ते असच होत राहणार. त्याच्या विरुद्ध जाण कदाचित जमल नसत मला, म्हणुनच तुला सोडुन दुर निघुन जाण्याचा निर्णय मी घेतला. आज मला तुला सोडुन जाण्याचा पश्चाताप नाही आहे पण खंत मात्र नक्किच आहे कि कदचित माझ्या प्रेमामुळे मी माझा एक चांगला मित्र गमावला. पण खर्च तु माझा मित्र होतास का? का जमल नाही मला तुझ्या नात्याशी तुझ्या इतकच पवित्र राहण का जमल नाही?
जमल असत पण कदाचित मला ते मान्य नह्वत ह्याला कारणीभुत होता माझा समाज. हो माझा समाजच ह्या सर्व गोष्टीला जबाबदार ठरला. तुझ्या प्रेमावर तुझ्या निष्ठेवर मला काडीमात्र शंका नह्वती. जितका तु सरळ होतास तितकीच निष्ठावंत जर मी सुद्धा राहीले असते तर आज परीस्थिती नक्किच वेगळी असती. कदाचित मी तुझ्या सोबत असते फक्त तुझिच बनुन. आज तस नाही आहे आजची स्थिती वेगळी आहे कारण माझ्या नावापुढे वेगळच नाव आहे. जे कदाचित तुझ असल असत आज ते कोणा दुसर्‍याच आहे. मी कोणा दुसर्‍याची आहे. हे मला मान्य आहे कारण तो रस्ता मीच निवडला होता. तुला सोडण्याचा सर्वस्वी निर्णय मीच घेतला होता.
आजही मी दु;खी नाही आहे. खुप सुखी आहे मी. खुप सुखी. पण फरक फक्त इतकाच आहे कि तु नाही आहेस माझ्या सहवासात. आज तुझी साथ नाही आहे. मी एकटी ही नाही आहे सोबत नक्किच आहे माझा वारा. ज्याच्या सोबत मी दुर दुर वाहुन आले होते तोच वारा त्यानेच मला बरसवुन मला नवा अर्थ दिला. माझ्या जिवनाच सार्थक केल. आज जेव्हा ही मी आकाशाकडे पाहते मला तो खुप वेगळा भासतोय कदाचित त्याच्या सोबत कोणीतरी आहे. नक्किच कोणीतरी आहे. कोणी तरी चांदणी आहे त्याच्या जवळ........
हो तीच आहे आज ती मला स्पष्ट दिसतेय. ती तेव्हा ही होती का? होती का ती?
हो होती ती तेव्हा ही होती पण सुर्यामुळे ती मला दिसली नाही. आज ती स्पष्ट दिसतेय. पण मग मला का वाईट वाटतय.?
मी तर सोडल होत ना तुला मग का? का मला त्या चांदणीचा राग येतोय. एक मन सांगतय की झाल ते खुप चांगल झाल कदाचित आतातरी तुला कोणीतरी आधार मिळेल. कोणाची तरी निरंतर साथ मिळेल. मग मला अस का वाईट का वाटतेय. मी सुद्धा तर खुप खुश आहे वार्‍यासोबत मग हे काय आहे जे मला पुन्हा तुझ्याजवळ ओढ्तय. नक्कि काय आहे हे? खरच ह्या प्रश्नाच उतर मला मिळेल का? कि आज आपण दोघेही सुखी आहोत. आपापल्या विश्वात रमत आहोत पण हे नक्कि काय आहे?
आपल्यातल नात काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतेय?
काय.....................................?

******************

आज मला तु दिसलास, खुप दिवसांनी. शेवटी तुला त्या चांदणीने जिंकलं. तुला सर्वस्व दिल. तुझ्या प्रेमाच सार्थक केलं. खरचं माझी लायकी नव्हती रे तुझं प्रेम संपादन करण्याची. तु खुप चांगला होतास. तु खुप चांगला आहेस ही. आता मला असं वाटतेय की माझीचं निवड चुकली. आपण कधीच आपल्या प्रेमाचा स्विकार केला नाही. तु खुप प्रयत्न केलास मला तुझं बनवण्याचा. पण मी तुझी कधी होउच शकले नाही. आज मला दु:ख होत नाही आहे. मला वाईटही वाटत नाही. पण मला खुप त्रास होतोय. तो त्रास कसला होतोय ते ही मला समजत नाही. चांदणी तुझिच होति. कायम. मग मी कोण होते तुझी. आज पाच वर्षांनी मी तुला माझ्या समोर पहिलं आणि मला खुप खंत वाटली, की आज मी त्या चांदणीच्या जागी असते तर किती बर झाल असतं. मी जगातली सर्वात सुखी मुलगी असते. हो मुलगीच आहे ना मी.? अजुन माझ्या वार्‍याने माझा स्विकार कुठे केला आहे? मला तर तो अजुनही भरकटवतचं आहे. कधी स्वतः सोबत तर कधी स्वतःच्या अवती भवती मला फिरवत आहे.
मला राणी व्ह्यायच होत वार्‍याची? पण आज अस वाटतेय हा वारा कधी स्थिर होइल का? तो कधी कोणाचा होऊ शकेल का? कारण वारा हा कधीच कोणासाठी थांबत नाही. तो सतत वाहत असतो. कधी इथे तर कधी तिथे, त्याला कधीच जाणिवही नसते कि आपल्यासोबत कोणी आहे. कोणि तरी आहे जो नेहमी आपला पाठलाग करत असतो. ज्याला आपल्या आधाराची गरज असते. जो सतत आपल्या सोबत राहण्यासाठी तडफडत असतो.
त्याला आपला हाथ हवा असतो, त्याला आपली साथ हवी असते. कोणितरी आहे जो प्रत्येक क्षणी त्याचीगरज असते. नकळत तो आपल्या सोबत वाहुन आलेला असतो.?
मला खुप हौस होती. लग्न करायच. संसार करायची. दुसर्‍याच्या अस्तित्वाला आपलं बनवायची. पण आज मला अस जाणवतेय कि माझ हे स्वप्न असचं अपुर्ण राहणार आहे. ह्या ग्रह तार्‍यांसारखी मी सुद्धा अनंत काळ ह्या आकाशात भटकत राहणार आहे. माझ्या ह्या अस्तित्वाला कधी पुर्णत्व येईल का?
क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तृष्णा,
तुझ्या नावाला शोभेलंस लिहिलंयस गं...
ढागांनाच सवय असते वार्‍याच्या वेगाने उडायची वार्‍याला पर्वा असो ना असो पण ढग नेहमिच त्याच्या सोबत असतात. अगदी तसेच तु अजुनही चिरकाल तसाच आहे. मलाच नाद लागला आहे वार्‍याचा.>>> छान!!!

गद्य कविता वाचल्यात भरपूर, आज पद्य ललित वाचलं. छोटंसं पण छान आशयगर्भ असं ..आवडलं. पु.ले.शु. Happy

तॄष्णा, चांगलं लिहिता आहात. छोटं पण अगदी आतून आल्यासारखं.
(लेखाचं नाव "आपलं नातं" aapalaM naataM करणार का?) तसच किंचित शुद्ध लेखनाकडे लक्षं दिल्यास वाचायला सुख आहे.