स्मरणांची झटकून जळमटे...

स्मरणांची झटकून जळमटे...

Submitted by बेफ़िकीर on 11 July, 2019 - 04:35

स्मरणांची झटकून जळमटे...
=====

स्मरणांची झटकून जळमटे रोज करू पाटी कोरी
रोज नवी आरास क्षणांची येत राहते सामोरी

क्षणोक्षणी दिसतात लगडलेल्या इच्छा नवनव्या तिला
क्षणोक्षणी दुर्बल होते आयुष्याची बळकट दोरी

गतकाळाला "करायचे ते कर तू" म्हटलो तोऱ्याने
बोलणे तसे ठामच होते, पण चर्या गोरीमोरी

दोघांपैकी कुणीच नाही सोसत माझ्या हृदयाला
स्वभाव माझा हळवा आहे, शरीर माझे माजोरी

आधी असत्या तर आम्हाला प्रेमबीम कळले असते
कुणास ठाउक तेव्हा का नव्हत्या या हल्लीच्या पोरी

Subscribe to RSS - स्मरणांची झटकून जळमटे...