Y_S

नाती जपायला मला आवडतात

Submitted by योगेश क्षिरसागर on 4 July, 2019 - 02:50

नाती जपायला मला आवडतात
पण
ती नाती जपण्या सारखी असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
पण
त्या वाहत्या झऱ्या प्रमाणे असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
पण
त्या फुलपाखरा प्रमाने असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
पण
त्या उमलत्या कळ्या प्रमाणे असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
पण
ती उगवत्या सूर्य प्रमाणे असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
पण
त्या निर्मळ,निश्चल असावी लागतात...

नाती जपायला मला आवडतात
परंतु नाती जपण्या सारखी असावी लागतात...

विषय: 
शब्दखुणा: 

शेवटची आठवण

Submitted by योगेश क्षिरसागर on 3 July, 2019 - 14:40

बोलता न बोलता खूप काही सांगायचं होत
थोडं का होई ना आयुष्य तुझ्या सवेच जगायचं होत
खेल समजून का ग होईना
पण
प्रेमात तुझ्या पडायचं होत
ठाऊक नसेल तुला पण तुझ्या
हसण्याच कारण मला व्हायच होत
कळत न नकळत का होई ना तुझं मन मला जपायच होत
जरा का होई ना तुला माझ्यात बघायच होत
पाहिलेले मि स्वप्न सत्यात उतरवायच होत
दुरावा मिच केला पण खरंच दूर जायचं नव्हत
दुःख अनंत आहे मला त्याचे कारण तुला ठरवायच नव्हतं म्हणुनी दूर लोटतो प्रिये तुला हसताना पाहायचं होत
घेतोय अखेरचा निरोप सखे
आठवणीत तुज्या मला सरायच होत

विषय: 
शब्दखुणा: 

माझी परी

Submitted by योगेश क्षिरसागर on 2 July, 2019 - 15:14

तू जशी उमलती कळी
गोड आकाश्यातील परी

लख लखात्या चांदण्यात बहरलेल्या रानात
पावसाच्या सरी सवे जणू आल्या अंगणात

इवलेशे फुलपाखरू शोधते गोडवा मधात
का कोण जाणे काय जादु आहे तुझ्यात

खल खळता झरा जणू दिशा शोधतो रानात
इंद्रधनू प्रमाणे दिशा बहरल्या मनात

चाफ्याचा गंध दरवळे अंबारात
शोधतो तुला मी भिरभिरत्या पाखरात

तूच ग परी माझी साद घाली स्वप्नात

Yogesh_k'sagar

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Y_S