प्रेम नसल्याने झालेली अवस्था

एकटे अजूनही

Submitted by जोतिराम on 19 June, 2019 - 05:50

सुरुवातीच्या काळात त्यांच्यात प्रचंड प्रेम होतं, पण जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांचं प्रेम ओसरत गेलं,आणि शेवटी फक्त सोडून जाता येत नाही (कर्तव्य)म्हणून एकत्र राहावं लागतंय आणि अजूनही दोघांना आशा आहे की सगळं ठीक होईल

आयुष्य साथ राहिले,
पण एकटे अजूनही.
बांधून घेत राहिले
अन एकटे अजूनही

दोघात खेळ मांडला
एकास एक भांडला
ना दूर जाता जाहले
बघ एकटे अजूनही

वेदना दोघांस होती
सारखी अन शांत होती
साथी बनून सोसले
तरी एकटे अजूनही

Subscribe to RSS - प्रेम नसल्याने झालेली अवस्था