प्रेमपाऊस

प्रेमपाऊस

Submitted by तुषार विष्णू खांबल on 14 June, 2019 - 05:13

प्रेमपाऊस
शब्दांकन : तुषार खांबल

भरून आलं आभाळ, मी सावरून बसलो,
हातामधली सर्व कामे, आवरून बसलो

ढग आणि विजेचा, सुरु झाला सुरेख खेळ
भिजावं कि राहावं असंच, मनात सुरु घालमेल

गडगडाटाच्या नादासंगे, थेंब बरसू लागले
न राहून माझे मन, भिजाया तरसू लागले

खिडकी मधुनी पाऊस पाहताना, नजरेस ती दिसली
काय सांगू मित्रांनो, मनात घर करून बसली

नजरेस नजर भिडली, काळीज खलास झाले
मन माझे क्षणार्धात, प्रेमपावसात न्हाले

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रेमपाऊस