पहिली रात्र
पहिली रात्र
=====================================================================
पहिली रात्र !...
अर्थात , लग्नानंतरची पहिली रात्र .
अशी रात्र, जिची अतिशयोक्त वर्णनं कथा-कादंबऱ्यांमधून, गीतांमधून वर्णिलेली असतात .
अर्थात, हेही खऱं की दोन विजा लखलखणार असतात. एकमेकांना टक्करणार असतात.
अशा त्या रात्रीची वाट पाहण्यात रात्रीमागून रात्री लोटलेल्या असतात.
प्रत्येकाची रात्र वेगळी.
प्रत्येकाच्या मनातली रात्र वेगळी.
अन प्रत्येकाच्या आयुष्यातली ?... रात्र वेगळी.
वेगळी ?
अर्थातच वेगळी. जशी ती आता चंद्रकांतच्या आयुष्यात होती...