मैत्र १०

मैत्र - १० (ब)

Submitted by हरिहर. on 16 March, 2019 - 10:15

आम्ही माथ्यावर उभे होतो. मी मागे पसरलेल्या गवताकडे पाहीले. ते छान हवेवर डोलत होते. पण आता दुरवरुन यावेत तसे हळू हळू बंदुकींच्या फैरी झडाव्या तसा कडकड आवाज यायला सुरवात झाली. डोलणाऱ्या गवताच्या वर हवा एकदम मृगजळासारखी हलताना दिसायला लागली. अचानक अतिशय गरम हवेचा एक झोत अंगावरुन गेला. डोळ्यांची आग झाली. घसा एकदम कोरडा पडल्यासारखा झाला. धुर दिसत नसला तरी त्याचा वास सगळ्या वातावरणात भरुन राहीला होता. धोंडबाने एका झटक्यात माझा हात ओढला. चांगलाच हिसडा बसुन मी त्याच्या मागे ओढला गेलो. पण आम्ही जाणार कुठे? दोन्ही बाजूला उंच वाळलेले गवत होते.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मैत्र १०