मनीमाऊ

मनीमाऊ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 January, 2019 - 00:09

मनीमाऊ

आई एकदा
नव्हती घरात
मनी गुपचूप
आली दारात

सावधपणे बघत बघत
गेली की सैपाक घरात

गरम दुधात
घातलं तोंड
पोळता कशी
मोडली खोड

शेपूट धरून
चाटत बसली
चोरटीवर
आई रुसली

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मनीमाऊ