गटग २०१८

इष्ट मित्र स्वजन सखे ही तो सुखाची मांडणी. (गटग वृत्तांत-२०१८)

Submitted by हरिहर. on 22 November, 2018 - 13:19

कोजागिरीसाठी मी आमच्या शेतावर गेलो होतो. रात्रभर गप्पा मारुन पहाटे अंघोळी उरकुन पुन्हा शेतात आंब्याच्या झाडाखाली येऊन आम्ही लवंडलो होतो. इतक्यात ग्रुप मेसेजचा विशिष्ट टोन वाजला. कालपासुन तिकडे फिरकलो नव्हतो त्यामुळे उत्सुकतेने पाहिले. साधनाताईने गटगची दवंडी पिटली होती. अगोदर तारीख पाहीली तर खुप वेळ होता. दिवाळीनंतर जायचे होते त्यामुळे फारशी चिंता नव्हती कामांची. मुळात यावेळी गटग दिवाळी फराळासाठीच होते. दुसरं कारण म्हणजे आमच्या गावाकडील मित्रांचे रात्रीच जोरदार गटग झाल्यामुळे लगेच दुसऱ्या गटगचा मेसेज पाहून फारसा उत्साहही वाटला नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गटग २०१८