जणु तीर ये उराशी

जणु तीर ये उराशी!

Submitted by चैतन्य दीक्षित on 22 October, 2018 - 22:04

वाटे मला असे की जणु तीर ये उराशी
माझ्याकडे बघून तू लाजता जराशी

माझे-तुझे कराया आहोत वेगळे का?
सांगू कशा जगा मी माझी 'तुझी' मिराशी?

गीतात नाव आले जेव्हा तुझे सखे गं
विसरून शब्द होतो घोटाळलो स्वराशी

सस्त्यात येत नाही तव आठवण कधीही
मन नाव कागदाची सलगी करी पुराशी.

राहील काय नाते माझे तुझे चिरंतन?
उडणार अत्तराशी, जळणार कापराशी!

~ चैतन्य

Subscribe to RSS - जणु तीर ये उराशी