गझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे

गझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे

Submitted by बेफ़िकीर on 8 September, 2018 - 11:34

गझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे
==========

काहीच बचत नसण्याला बचत करावे
जे ज्याचे आहे त्याला परत करावे

मी पैसा पैसा कधीच केले नाही
मग पैश्याने का मी मी सतत करावे

सोप्या मेंदूशी लग्न करावे आता
अवघड हृदयाला आता सवत करावे

मी सांगत नाही उंच किती आहे मी
का नामवंत झाडांना गवत करावे?

प्रत्येक पावलावरती लढा निराळा
आपली न असते जितकी कुवत, करावे!

'बेफिकीर' आहे दुनिया साली सारी
जे करायचे ते मर मर मरत करावे

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - गझल - काहीच बचत नसण्याला बचत करावे