रोज मरगळ

रोज मरगळ

Submitted by बेफ़िकीर on 2 July, 2018 - 10:34

गझल - रोज मरगळ

रोज मरगळ उगीच का येते
आठवणही.... तुझीच का येते

वेळ सांगून येत नसुदे पण
वेळ केव्हातरीच का येते

तो मनांना दुखावतो कायम
त्यास बरकत बरीच का येते

खिन्न डोळे पुसायच्या कामी
रोज रात्री उशीच का येते

भेटतो तो विचारतो आहे
'दुःख माझ्या घरीच का येते'

भिंत नेतात जे अशांनाही
न्यायला पालखीच का येते

जे हवे ते लिहून ठेवा.... पण
शेवटी वाळवीच का येते

एवढा 'बेफिकीर' असुनी तू
सांग कामी शमीच का येते

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रोज मरगळ