खून (शतशब्दकथा)
Submitted by स्वप्ना_राज on 16 June, 2018 - 04:12
त्याचे डोळे विलक्षण शांत होते. ते डोळे अत्यंत थंड डोक्याने एखाद्याचा जीव घ्यायची योजना आखणाऱ्या क्रूरकर्म्याचे आहेत ह्यावर सांगून कोणाचा विश्वास बसला नसता. तिचाही बसत नव्हता.......त्याच्या हातातलं रोखलेलं पिस्तुल बघूनही. हा माणूस आपल्याला इतके दिवस आवडत होता? हा माणूस? आपल्या हे आधी कसं नाही लक्षात आलं? नाही, नक्कीच काहीतरी चूक होतेय.
ती स्वत:शी असं म्हणत राहिली पण तिला माहित होतं की जे समोर दिसतंय तेच सत्य आहे.
एव्हढ्यात दार उघडून तिचा नवरा आला आणि हे सगळं बघून दारातच थांबला.
विषय:
शब्दखुणा: