#माझे काव्य

त्या प्रश्नाला देईन उत्तर

Submitted by mahesh naykude on 10 May, 2018 - 04:27

दृष्टचक्र जरी दुर्भाग्याचे मार्ग तिथेही असतील सत्तर ।
हीच परीक्षा सामर्थ्याची त्या प्रश्नाला देईन उत्तर ।।

धडपडणारे हात चिमुकले
थकून पुन्हा स्वतः सावरती,
लथपथ झाले पाय तरीही
नजर अजुनी क्षितिजावरती,
धैर्य जिद्द हे शस्त्र घेऊनी दुर्भाग्याचे फोडीन पत्थर ।
हीच परीक्षा सामर्थ्याची त्या प्रश्नाला देईन उत्तर ।।

मित्रही परका शत्रूसम तो
संग सोबती हवा कशाला,
मार्ग वेगळा जाणून माझा
कुबड्या परी तो दुवा कशाला,
साथ हाताला देता कोणी मित्र मानूनी चालू अंतर ।
हीच परीक्षा सामर्थ्याची त्या प्रश्नाला देईन उत्तर ।।

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #माझे काव्य