गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल

गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)

Submitted by बेफ़िकीर on 22 April, 2018 - 06:37

गझल - एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल, २०१८)

एक साला फोन नाही येत हल्ली
आणि केलेला न कोणी घेत हल्ली

थांबलो असतो शिरुरला आजही मी
साथ नाही देत ही तब्येत हल्ली

एकमेकांशी न होते भेट आता
मी तुझ्या, तूही तुझ्या समवेत हल्ली

राहतो सोसत जगाला जन्मलेला
केवढ्या थाटात जाते प्रेत हल्ली

का उगी जन्मास आलो माणसाच्या
मन कुणी कोणास नाही देत हल्ली

बस मला टाळी मिळो ह्या वासनेने
आणतो गझलेत माझ्या शेत हल्ली

मी मराठीचा कुणी पाईक नाही
त्यामुळे रेतीस म्हणतो रेत हल्ली

Subscribe to RSS - गझल -  एक साला फोन नाही येत हल्ली (२२ एप्रिल