मशाली

--मशाली--

Submitted by Nilesh Patil on 17 April, 2018 - 02:46

--मशाली--

उगाच हातात घेतल्या त्या मशाली,
वादळ आणि वाऱ्याने विझल्या त्या मशाली..।

उजेड दाखवण्यासाठीच सरसावले होते हात,
पण,अंधारात नच टिकल्या त्या मशाली..।

नेल्या झुंडीने जपून पण तरीही,
पावसात साऱ्या भिजल्या त्या मशाली..।

पेटणाऱ्या,भडभडणाऱ्या झाल्या आता शांत,
सतत वाऱ्याच्या घावात शमल्या त्या मशाली..।

मृत देहासाठी सरसावल्या,पुढे आल्या,
राख करण्यासाठी पुन्हा, पेटल्या त्या मशाली..।

--निलेश पाटील,--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-9503374833--

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मशाली