गझल वगैरे

गझल वगैरे

Submitted by बेफ़िकीर on 4 April, 2018 - 11:50

गझल - गझल वगैरे

कशाला गझल वगैरे ऐकवायची आता
कुणाला गझल वगैरे ऐकवायची आता

तसेही पोचणार नाहीच कुठेही आपण
स्वतःला गझल वगैरे ऐकवायची आता

बिचारा सवंग दुनियेमध्ये अभंग विकतो
तुक्याला गझल वगैरे ऐकवायची आता

दरोडेखोर सुरा मानेस लावुनी म्हणतो
सुऱ्याला गझल वगैरे ऐकवायची आता

बापाचा जोडा होतो त्याला आता
मुलाला गझल वगैरे ऐकवायची आता

मला हा 'आज' आजही धमकावूनच गेला
'उद्या'ला गझल वगैरे ऐकवायची आता

किती वेळाने कळले 'बेफिकीर'आहे मी
म्हणाला गझल वगैरे ऐकवायची आता

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गझल वगैरे