आधाराला वेलीलाही धरतो

आधाराला वेलीलाही धरतो

Submitted by बेफ़िकीर on 30 March, 2018 - 12:54

गझल - आधाराला वेलीलाही धरतो

आधाराला वेलीलाही धरतो
वृक्ष मुळापासून जसा हादरतो

कातरवेळी कुणी आठवत नाही
असा इसम सर्वात सुदैवी ठरतो

बार जगाचा व्हावा, इच्छा आहे
कोणालाही कोणीही सावरतो

नवीन काही बरे कराया जावे
जुन्या स्मृतींचा राक्षस का खाकरतो

वापरून झाले त्याचे इतरांनी
आता मूर्ख स्वतःचे मन वापरतो

आज कालला हासत म्हणे बघू तो
कालचा दिवस आज कसा निस्तरतो

तुच्छ बनावे हेच स्वप्न असताना
अडचण ही, की महान ठरुनी मरतो

फक्त मुज्या मकरंद असत पाठीशी
त्याचमुळे तो आज इथे वावरतो

Subscribe to RSS - आधाराला वेलीलाही धरतो