ठोकळा

ठोकळ्यांचा कारखाना...

Submitted by Anuja Mulay on 29 March, 2018 - 02:16

    वर्षानुवर्षे चालू असलेल्या एका कारखान्यात आज नवीन माल येणार होता. अर्थात काही जुने,अर्धवट आकार देऊन झालेले ठोकळे तिथे होतेच. तिथे काम करणाऱ्या कामगारांना तसं नवीन येणाऱ्या मालाचं कौतुक नव्हतंच म्हणा. त्यांच्यासाठी काय दरवर्षी एका ठराविक काळात नवीन लाकडं यायची.त्या सगळ्या लाकडांना एकसारखा आकार देऊन, काही वर्षं त्यांच्यावर काम करून सगळे ठोकळे एकसारखे बनले, की मग पुढच्या विक्रीसाठी त्यांना पाठवलं जायचं. हा कारखानासुद्धा अगदी इतर कारखान्यांसारखाच होता. अनेक ठिकाणांहून माल यायचा, मग काही ठराविक जुने कुशल कारागीर त्या आकार देण्याच्या कामाला लावून मालक कसा निवांत व्हायचा.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ठोकळा