कलह

दुही

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 January, 2018 - 08:25

विष बीज ते दुहीचे
खोल मनात रुजले
ओल्या भूमीत नवीन
बळ घेवून उठले

हाती दगड पेलले
रान डोळ्यात पेटले
मित्र मनातील सारे
शत्रू क्षणातच झाले

मत पेटीच्या पिकाचे
राजे गालात हसले
पडू आलेल्या खुर्चीस
टेकू चार ते लागले

प्रेम हवे जगण्याला
द्वेष हवा असे का रे ?
भीतीमध्ये गाडलेल्या
भूता मृत्यू नसे का रे ?

जात धर्म पंथ मग
वर्ण भाषा वंश आदी
रावणाची मुंडकी ही
नच संपणार कधी !

Subscribe to RSS - कलह