काहीच्या काही कविता

लेखकाला आलेलं कुणाचंही पत्र

Submitted by mess-age on 23 April, 2009 - 00:49

कोणत्याही दुपारी कुणाचंही पत्र येतं रंगीत कव्हर वालं
पत्र मिळताच त्यावर तुटून पडतात
भुकेल्या नजरेने लेखकाच्या घरातले सर्व
आई, बहीण, बायको, काकी आणि चुलतभाऊ इत्यादी.
लेखक दमून येतो पत्रासारखा प्रवासातून

कल्पना, कविता, मनिषा, आशा आणि प्रेम

Submitted by nikhil_jv on 21 April, 2009 - 03:17

कल्पनेतुन कवीचा जन्म होतो
मग कल्पनाच नसेल तर
कवी कसा जन्मणार?

मनिषा तेथे दिशा आहे
मग दिशाच भटकली
तर मनिषा कशी पूर्ण होणार?

आशेवर जग आहे?
मग जगायचच नसेल
तर आशेवर कशाला राहणार?

प्रेमात सर्व काही माफ
मग प्रेमात खून केला

कोंबडी भुंकाया लागली......

Submitted by satish_choudhari on 21 April, 2009 - 02:27

कोंबडी भुंकाया लागली पहाटे
अन् कुत्रं करते कुकूच कु....
कसा हो जमाना आला बघा
नवराबायकोचं भांडण असं
चालतयं घरी खुपच खु.....

असली नुसती कटकट सारी
बायकौ करते वटवट भारी
ती पण कामी मी पण कामी
ना तीही कमी ना मीही कमी

एक चहाटळ चारोळी

Submitted by एम.कर्णिक on 18 April, 2009 - 10:37

बाटली
bottle.jpg

एकदा एका बाटलीने
दारू थोडी चाटली
आरडाओरड झाली लगेच
बाटली बाई बाटली

फुलपाखरु

Submitted by umeshkadamsir on 15 April, 2009 - 12:02

रंगीबेरंगी या जगात प्रत्येकालाच वाटत असते फुलपाखरासारखे स्वच्छंद बागडावे
पण बागडताना ईतरांना कधीही दुखवत नाहीत ती सुंदर फुलपाखरे
जिवनाची मजा अशीच लुटत रहावी

आणखी एक गजनी

Submitted by कौतुक शिरोडकर on 15 April, 2009 - 06:34

"तसं मला सगळं लख्ख आठवतं.....
पण 'पाच' पुर्वीचं काही आठवत नाही.
बोललो असेन..... नाही असं नाही...
पण मला नीट आठवत नाही. म्हणून...
म्हणून तर परत मी तुमच्याकडे आलो.
तुमच्यामुळे मला आठवेल मी काय काय विसरलो ते...

फ्युज उडाला……..!

Submitted by satish_choudhari on 13 April, 2009 - 06:42

फ्युज उडाला मनाचा
अन् तुझं जनरेटरही बंद पडलं
युपिएसवरती सिस्टीम चालु
अन् ऱ्यामचं आता डोकं फिरलं…

काय करावं काही कळेना
प्रेमाची बुटिंग बंद झाली
कशातुन बुट करू
सिडिरोमही जीवाचं बिघडलं….

कशीबशी जिंदगी हि

वळू...

Submitted by satish_choudhari on 12 April, 2009 - 08:41

ये बघ ना... आलाय तो
अरे बघ की
टपक .. टपक चालु लागला
बघ मागे वळुन बघतोय

मेला कुठला...
जोऱ्यानं ओरडते गंगुबाई
कानाखाली वाजविन ना मी
बसशील बोंबलत....
चल पळ इथुन

आता अंगात शिरलयं वारं
हे बुजगावणं कुठलं न्यारं...
गुलुगुलू माझा

आमी बी कविता करतो

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 April, 2009 - 05:16

पुन्हा एकदा हि जुनी कविता वर आणायचा मोह होतोय... Wink

म्हनलं चला आपणपण कविता पाडू
तेनी म्हनले Angry 'लय' नका तोडू

नायतर शब्दांन्ला नसंल शब्दांचा पायपोस
आम्ही म्हनू याला शब्दाचा लई सोस

आशय नसेल तर कोणाचं काय जातं
सुद्धलेखन करताना मन आमचं जळतं

आम्ही इचारलं हेडर फुटर काय घालू
त्येच्या नादात ते बेणं मिटर इसरलू

राजाची राणी

Submitted by अलका_काटदरे on 10 April, 2009 - 05:15

राजा व्हावे सर्वांनाच वाटते
कालांतराने त्यांना आपण राजे आहोत असेही वाटते

कोणी रानावनाचा, कोणी कोकणचा
कोणी राज्याचा कोणी देशाचा
कोणी समुहाचा कोणी मित्रांचा

स्वमनाचे राजे सर्वत्रच असतात

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता