लिहिता लिहिता

लिहिता लिहिता

Submitted by शिवाजी उमाजी on 12 August, 2017 - 20:45

लिहिता लिहिता

कोणता रंग शोधू इथे जगण्यास आता
रंगो अंगी कोणता मिळो पोटास आता

घेतला बांधून जेव्हा डोई फेटा गुलाबी
लावून अत्तर बैसलो मी पंगतीस आता

होच तू थोडा उदार पावसा जरा तिकडे
उजु दे कुस तीची भिजव मातीस आता

थकलेत प्रवासी लटकूनी गाडीस येथले
शोध मार्ग यंत्रणे आवरण्या गर्दीस आता

पोसावे कुठवर बलात्काऱ्यांस येथल्या
न्यायानेच मिळो शिक्षा अन्यायास आता

म्हणतो शिव व्यक्त हो लिहिता लिहिता
घ्या समजून श्रोते तुम्ही भावनेस आता

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लिहिता लिहिता