देवा देवा

देवा देवा

Submitted by शिवाजी उमाजी on 18 July, 2017 - 02:57

देवा देवा

नसे चित्त हे आता थार्‍यावरी देवा
फिरे देह माझा हा वार्‍यावरी देवा

तुझे भक्त रे आम्ही पायीच चालावे
दिमाखात ऊभा तू वीटेवरी देवा

कुणा तूप रोटी दूजाभाव तू केला
असे पोट कोणाचे हातावरी देवा

निती गैर झाली लोकांची पहा आता
तया चांगले घ्यावे फैलावरी देवा

दिला वापराया एका मोकळा वाडा
जगावे कसे मी या वाटेवरी देवा

पडू देत यंदा धोधो पाऊस येथे
पहा राबतो खासा शेतावरी देवा
©शिवाजी सांगळे, मो. +91 9545976589

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - देवा देवा